घटना



१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.

१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

१९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

१९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.

१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.

१९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.

२०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.


जन्म




१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.

१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

१८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)

१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)

१८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)

१९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.


मृत्यू



३६३: रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.

१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)

१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)

२००४: भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

२००५: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४८)

२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27