घटना



१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.


जन्म



१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)

१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)

१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९३९: भारतीय चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २०२०)

१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

१९५५: भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार रांजॉन घोषाल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २०२०)


मृत्यू



१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)

१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

१९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)


>

मार्च

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24 31
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28