घटना



१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.

१९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.

१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.

२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.


जन्म



१८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)

१९०२: धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)

१९१७: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)

१९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)

१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

१९७४: चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.


मृत्यू



१६७०: नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.

१८९४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)

१९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९४)

२००१: क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९२८)

२००२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९१३)


>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29