घटना



१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९७९: घानामधे लष्करी उठाव.

१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.

१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.


जन्म



१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

१९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१९४६: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.

१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.

१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.

१९९०: भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.



मृत्यू



१९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

१९६२: अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

१९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

२०२०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासु चटर्जी यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३०)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27