घटना




१५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

१६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

१८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

१८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.

१८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.

१९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.

१९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

१९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

१९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते  उद्‍घाटन झाले.

१९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

२००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.


जन्म




१८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)

१८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)

१९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)

१९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.

१९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.

१९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.

१९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.


मृत्यू




१५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.

१८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)

१९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.

१९४६: भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)

१९५२: इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)

१९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

१९९५: प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.

१९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.

२००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.


>

मे

रवि 3 10 17 24 31
सोम 4 11 18 25
मंगळ 5 12 19 26
बुध 6 13 2027
गुरु 7 14 21 28
शुक्र 1 8 15 22 29
शनि 2 9 16 23 30