घटना



१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.


जन्म



१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.

१८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)

१८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)

१८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)

१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)

१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.


मृत्यू



१३३३:  निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)

१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)


>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29