घटना



१८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

१९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

१९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

१९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

१९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

२००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.


जन्म



१८३७: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

१९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

१९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

१९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.

१९८१: मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.


मृत्यू



१८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

१९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

१९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

१९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

२००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

२०२०: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९८४)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27