घटना



१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.


जन्म




१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)

१९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)

१९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म

१९५०: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै २०२०)

१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.


मृत्यू




१८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)

१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)

१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)

१९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)

१९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)

१९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)

१९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.

२०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)

२०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)




>

एप्रिल

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 2229
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24
शनि 4 11 18 25