घटना



१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.


जन्म



१८२८: रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९१०)

१८८४: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)

१९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.

१९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)

१९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.

१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.

१९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.


मृत्यू



१७९४: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)

१९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.

१९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

१९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे  यांचे निधन.

१९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)

१९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे   निधन. (जन्म: २५ डिसेंबर  १८८९)

१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)

१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.

१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.

२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)

२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)

२०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)


>

मे

रवि 3 10 17 24 31
सोम 4 11 18 25
मंगळ 5 12 19 26
बुध 6 13 2027
गुरु 7 14 21 28
शुक्र 1 8 15 22 29
शनि 2 9 16 23 30