घटना



६८: रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

१६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.

१७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

१९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

१९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९२३: बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

१९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

१९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.

१९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

१९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

१९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

१९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

२००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

२००४: कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

२००६: १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

२००७: बांगलादेशातील  चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.



जन्म




१६७२: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

१८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

१९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

१९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)

१९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

१९७७: अभिनेत्री अमिशा पटेल यांचा जन्म.

१९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

१९८५: अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म.


मृत्यू




६८: रोमन सम्राट नीरो यांनी आत्महत्या केली. (जन्म: १५ डिसेंबर ३७)

१७१६: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)

१८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

१८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

१९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)

१९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)

१९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

१९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

१९९७: इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

२०११: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27