घटना


१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.


जन्म


१७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

१८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

१९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

१९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)

१९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

१९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.


मृत्यू


१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

१९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

१९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

२०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)


ऑक्टोबर

रवि 4 11 18 25
सोम 5 12 19 26
मंगळ 6 13 20 27
बुध 7 14 21 28
गुरु 1 8 15 22 29
शुक्र 2 9 16 23 30
शनि 3 10 17 24 31