घटना


१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.

१९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.

१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.

१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.

१९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.

२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.

२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला. 

जन्म


१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)

१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)

१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.

१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)

१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)

१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)

१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)

१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.

१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.

१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.

१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.

१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.


मृत्यू१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन.

१८५०: फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन.

१८८६: मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७९५)

१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१)

१९४०: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८७५)

१९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)

१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)

१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)

२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)

२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.

२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29