घटना

१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

जन्म

१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

१९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.

१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)

१९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.

१९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.

१९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.

१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.

१९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

१९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.


मृत्यू

१२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४)

१८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६)

१८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)

१८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)

१९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२)

२०००: डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९०१)

२००१: संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.

२००१: टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल यांचे निधन. (जन्म: ३ मे १९२४)

२००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९३१)

२०१२: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)

२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)
ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29