घटना

१८५४: जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.

१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.

१९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

१९८४: अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.

१९९३: राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.

१९९८: फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२००१: मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

२००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.


जन्म

१७३०: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

१८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)

१८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)

१८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

१८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.

१८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)

१८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८)

१९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७)

१९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००२)

१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.

१९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

१९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.


 मृत्यू

२२१: चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८३)

१०६०: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचे निधन. (जन्म: ४ मे १००८)

१८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८०५)

१९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)

१९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)

१९९७: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)

२००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)

 


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29