घटना

१८५१: आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.

१८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.

१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.

१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.

१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.

१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.

१९५२: मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या.

१९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.

१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.

१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.

१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.

१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.

१९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.

१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.

१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.

२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.

२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.

२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.


जन्म

१८०१: ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे १८८९)

१८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर  यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९०७)

१८८०: चरित्रकार,वाड्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म.

१८८१: अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)

१८८७: नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)

१८९२: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस. आर. रंगनाथन यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)

१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)

१९१०: सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०)

१९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)

१९२४: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)

१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४)

१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७५)

१९२६: गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म.

१९४८: कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म.

१९५९: बुद्धीबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म.


मृत्यू

१९६४: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८)

१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन.

१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११)

१९८२: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचे निधन. (जन्म: १६ मे १९०५)

१९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.

२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३२)

 


ऑगस्ट

रवि 2 9 16 23 30
सोम 3 10 17 24 31
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 19 26
गुरु 6 13 20 27
शुक्र 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29