घटना


१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

१७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

१८४७: लायबेरिया स्वतंत्र.

१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.

१९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

१९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९६५: मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.

१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

१९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

१९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

२००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

२००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

जन्म

१८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

१८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)

१८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

१८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९)

१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१०९४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)

१९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.

१९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)

१९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.

१९४२: स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

१९४९: थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

१९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

१९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.

१९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.


मृत्यू

८११: बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.

१३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.

१८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.

१८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.

१९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.

१८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

२००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)

२०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)

२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)


जुलै

रवि 5 12 19 26
सोम 6 13 20 27
मंगळ 7 14 21 28
बुध 1 8 15 22 29
गुरु 2 9 16 23 30
शुक्र 3 10 17 24 31
शनि 4 11 18 25