घटना१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.

१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.

१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.

१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.

१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.

१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.

२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.


जन्म१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)

१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)

१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)

१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)

१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९८१)

१९३७: भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै २०२०)

१९४७: मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.

१९५३: भारतीय राजकारणी हरिभाऊ माधव जावळे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०२०)

१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.

१९७०: हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.


मृत्यू१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)

१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)

१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)

१९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)

१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)

१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)

१९६२: दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.

१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)

१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.

१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)

१९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)

१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)

१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)

२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.

२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)

२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)

२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27