घटना
१६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

१८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

१८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

१९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

१९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६६: शिवसेनेची स्थापना.

१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

१९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

१९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.


जन्म१५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १६४४)

१६२३: फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

१७६४: उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.

१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.

१९४१: चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.

१९४५: म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.

१९४७: ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.

१९७०: भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.

१९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.


मृत्यू१७४७: पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)

१८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.

१९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.

१९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)

१९५६: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

१९९३: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९११)

१९९६: समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.

१९९८: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

२००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९३४)

२०२०: भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याबेन शाह यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27