घटना


६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.

१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.


जन्म


१६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)

१८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)

१८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)

१९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.

१९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

१९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.


मृत्यू


१९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)

१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)

१९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)

१९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.

२००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.

२०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)


>

डिसेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 2330
गुरु 3 10 17 24 31
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26