घटना१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

२०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

२०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.


जन्म१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)

१९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.

१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.


मृत्यू१९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)

१९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)

१९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.

१९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)

१९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)


>

मार्च

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24 31
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28