घटना१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

१९७७: जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.

१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.


जन्म१४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)

१८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.

१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)

१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)

१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)

१९१९: भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री अमला शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै २०२०)

१९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)

१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा  जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)


मृत्यू
१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

१८३९: शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

२००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)


>

जून

रवि 7 14 21 28
सोम 1 8 15 22 29
मंगळ 2 9 16 23 30
बुध 3 10 17 24
गुरु 4 11 18 25
शुक्र 5 12 19 26
शनि 6 13 20 27